लेख क्रमांक – १
‘रात्री झोपण्यासाठी प्रयत्न करूनही झोप न येणे, यालाच आपण ‘निद्रानाश’ असे म्हणतो. झोप न येण्याची कारणे आणि आणि त्यावरील उपाय पुढे दिले आहेत.
१. झोप न येण्याची कारणे
अ. ताण-तणाव, चिंता
आ. बिघडलेली जीवनशैली
इ. झोपायच्या आधी भ्रमणभाष (मोबाईल), भ्रमणसंगणक (लॅपटॉप) किंवा दूरचित्रवाणी (टीव्ही) पहाणे
ई. शरिरात काही वेदना असणे
उ. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असणे

२. उपाय
अ. दुधात जायफळ उगाळून ते एक कप दुधात मिसळून प्रतिदिन रात्री झोपण्याआधी अर्धा किंवा पाऊण घंटा अगोदर पिणे : पहिल्या दिवशी सहाणीवर एक चमचा दूध घेऊन जायफळाचे ३ वेढे (फोडी) उगाळून ते एक कप दुधात मिसळून प्यावे. दुसर्या दिवशी ५ वेढे, तिसर्या दिवशी ६ वेढे आणि असे करत करत७ दिवसांपर्यंत एकेक वेढा वाढवत न्यायचा. सातव्या दिवशी९ वेढे होतील. सातव्या दिवसानंतर परत एक एक वेढा न्यून करत ३ वेढ्यांपर्यंत आल्यावर बंद करावे.
आ. प्रतिदिन रात्री एक छोटा कांदा किसून किंवा बारीक चिरून दह्यासमवेत खावा आणि त्यावर एक पेला (ग्लास) दूध प्यावे. असे ७ दिवस करावे. (हे औषध म्हणून घेत असल्याने ‘कांदा आणि दूध एकत्र कसे ?’, याचा विचार करू नये.)
इ. प्रतिदिन आपण झोपेची वेळ न पालटता एकच ठेवावी.
ई. झोपण्याची जागा किंवा खोली हवेशीर आणि थंड असावी.
उ. झोपण्याच्या खोलीत थोडा अंधार असल्यास चांगले; कारण त्याने लवकर झोप येण्यास साहाय्य होते.
ऊ. झोपण्याच्या अगोदर भ्रमणभाष (मोबाईल) किंवा दूरचित्रवाणी (टीव्ही) बघू नये.
ए. ताण-तणाव न्यून करण्यासाठी प्रतिदिन थोडा व्यायाम आणि योगाभ्यास करावा.
ऐ. रात्रीचे जेवण हलके घ्यावे.’
– डॉ. दीपक जोशी, निसर्गाेपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (२४.८.२०२४)