पणजी, २८ मार्च (वार्ता.) – वीज खात्याने पणजी येथील वीजखांबांवरील इंटरनेट जोडणीच्या केबल (आय.एस्.पी. केबल) तोडण्याच्या कामाला प्रारंभ केल्याची माहिती खात्याचे कार्यकारी अभियंता काशीनाथ शेट्ये यांनी दिली आहे. कार्यकारी अभियंता काशीनाथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार पणजी येथील रहिवाशांनी वीज खात्याकडे केलेल्या तक्रारींच्या आधारावर ही कारवाई करण्यात येत आहे.