अध्यात्माचे हे आहे अद्वितीयत्व !

‘अध्यात्मात ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धीने अभ्यास करावा लागत नाही. उलट बुद्धीलय झाल्यावर एकाच नाही, तर सर्व विषयांचे ज्ञान तात्काळ प्राप्त होते.’

स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व !

ईश्‍वरात स्वभावदोष आणि अहं नसतो. त्याच्याशी एकरूप व्हायचे असेल, तर आपल्यातही ते नसणे आवश्यक आहे.

वेद-उपनिषदे आदी अध्यात्मविषयक ग्रंथांचे महत्त्व !

‘युद्ध ही तात्कालिक बातमी असते. पुढे ५० – ६० वर्षांतच मोठमोठ्या युद्धांचा इतिहास विसरला जातो, उदा. पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्याआधीची सर्व युद्धे. याउलट अध्यात्मविषयक वेद-उपनिषदे इत्यादी ग्रंथ चिरकाल टिकून आहेत.’

साधना तरुण वयातच करण्याचे महत्त्व !

‘म्हातारपण आल्यावर ‘म्हातारपण म्हणजे काय ?’, हे अनुभवता येते. ते अनुभवल्यावर ‘म्हातारपण देणारा पुनर्जन्म नको’, असे वाटायला लागते; पण तेव्हा साधना करून पुनर्जन्म टाळण्याची वेळ गेलेली असते. असे होऊ नये; म्हणून तरुण वयातच साधना करा.’

हिंदू प्रतिदिन मार का खातात ?

‘धर्मासाठी इतर धर्मीय एक होतात, तर संकुचित वृ‌त्तीचे हिंदू केवळ जातीसाठी एक होतात आणि इतर जातीतील स्वधर्मियांशी भांडतात; म्हणून हिंदू प्रतिदिन मार खातात ! या वरचा एकमात्र उपाय म्हणजे हिंदूंना साधना शिकवून त्यांच्यात धर्माभिमान जागृत करणे !’

शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या स्तरांवरील कार्य

‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर कार्य करणारे दुसर्‍या स्तरावरचे कार्य करू शकत नाहीत; पण आध्यात्मिक स्तरावरच्यांचे कार्य सूक्ष्म स्तरावरील असल्याने त्यांचे कार्य सर्व स्तरांवर होते. त्यांचे वैशिष्ट्य हे की, विशेष काही करावे न लागता त्यांचे सर्व कार्य ईश्‍वरी कृपेमुळे होते.’

मूर्खपणाची कमाल करणारे धर्मद्रोही म्हणजेच ‘बुद्धीप्रामाण्यवादी’ !

‘देव बुद्धीच्या पलीकडे असतांना बुद्धिप्रामाण्यवाद्यांनी ‘देव नाही’, असे म्हणणे ही मूर्खपणाची कमाल आहे !’

‘साम्यवाद’ हा निरर्थक शब्द !

‘सजिवांतील एकही जीव दुसर्‍या जिवासारखा नसतांना, उदा. २ झाडे, २ कुत्रे, तसेच पृथ्वीवरील ८०० कोटी मानवांपैकी कोणतेही २ सारखे दिसत नाहीत. एवढेच नाही, तर त्यांची वैशिष्ट्येही निरनिराळी असतात, तरीही ‘साम्यवाद’ शब्द वापरणार्‍यांची ‘बुद्धी किती क्षुद्र आहे’, हे लक्षात येते.’

प्रवचनकार-कीर्तनकार यांचे महत्त्व !

‘प्रवचनकार आणि कीर्तनकार समाजाला धर्माची थोडीफार माहिती करून देतात. त्यांच्याशिवाय असे करणारे समाजात कुणी नाही.’

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण भक्त बनणे आवश्यक !

‘श्रीराम स्वतः ईश्वराचा अवतार होता. पांडवांच्या वेळी पूर्णावतार श्रीकृष्ण होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी समर्थ रामदासस्वामी होते. यावरून लक्षात येईल की, ईश्वरी राज्याची स्थापना ईश्वर स्वतः करतो किंवा संतांकडून करवून घेतो….