उष्णता न्यून करण्यासाठी करावयाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उपाययोजना !

‘सध्या सर्वत्र उन्हाळा चालू झालेला आहे. त्यामुळे शरिरातील उष्णता वाढून उष्णतेचा त्रास होत आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांनी उन्हाची मोठी लाट भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अशा भीषण उन्हाळ्याला सामोरे जाण्यासाठी प्रभावी उपाय असणारी माहिती जाणून घेणे नितांत आवश्यक आहे. देवाच्या कृपेने उष्णतेचे प्रकार आणि त्यांच्यावरील उपाय यांच्या संदर्भात स्फुरलेले विचार येथे लेखबद्ध केले आहेत.

प्रतिकात्मक छायाचित्र

१. उष्णतेचा स्तर, उष्णतेचे स्वरूप आणि उष्णता न्यून करण्यासाठी करावयाचे विविध उपाय

२. देहातील उष्णता अल्प करण्यासाठी पिण्याच्या पाण्यात विविध वनस्पती घालणे

टीप – विविध पानांचा रस किंवा पाने ३ घंटे पाण्यात बुडवल्यानंतर सिद्ध झालेले पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळून अंघोळ केल्यास देहातील उष्णता न्यून होण्यास साहाय्य होते.

३. उष्णतेचा अन्य त्रास आणि त्यावरील उपाय

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

३ अ १. त्रास : उष्णतेमुळे देहाच्या आठव्या द्वारावर (लघवीच्या ठिकाणी) आणि नवव्या द्वारावर (गुदाच्या ठिकाणी) फोड येतात.

३ आ. विविध उपाय

३ आ १. शारीरिक स्तरावरील उपाय : उगाळलेले १ चमचा चंदन पाण्यात घालून हे पाणी प्राशन केल्यास मल आणि मूत्र मार्गात वाढलेली उष्णता न्यून होण्यास साहाय्य होते.

३ आ २. आध्यात्मिक स्तरावरील उपाय : देहाच्या आठव्या द्वारावर (लघवीच्या ठिकाणी) आणि नवव्या द्वारावर (गुदाच्या ठिकाणी) फोड आल्यास सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी त्या स्थानांतील उष्णता न्यून होण्यासाठी पुढील ३ प्रकारच्या देवतांच्या नामजपांचा संयुक्त नामजप शोधून काढला आहे. ‘।। श्री गुरुदेव दत्त ।। ।। श्री हनुमते नमः ।। ।। ॐ नमः शिवाय ।। ।। ॐ नमः शिवाय ।। ।। ॐ नमः शिवाय ।।’ हा नामजप तो त्रास न्यून होईपर्यंत प्रतिदिन १ घंटा करावा.

४. कृतज्ञता

‘श्री गुरुकृपेमुळे उष्णतेचे विविध प्रकार आणि त्यांच्यावरील उपाय यांविषयीचे ज्ञान मिळाले’, यासाठी मी भक्तीभावाने श्री गुरुचरणी कृतज्ञतापुष्प समर्पित करते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.३.२०२५)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही संतांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक