भरतनाट्यम् विशारद होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी यांनी केलेला दोन प्रकारच्या घुंगरांचा तौलनिक अभ्यास

‘१८ ते २०.१.२०२१ या कालावधीत कु. अपाला औंधकर हिचे रामनाथी (गोवा) येथील संशोधन केंद्रात विविध नृत्यप्रयोग झाले. ती नृत्य प्रस्तुत करत असतांना तिने पट्ट्याचे घुंगरू आणि दोरीत गुंफलेले घुंगरू असे दोन प्रकारचे घुंगरू आळीपाळीने बांधले होते. त्या वेळी देवाच्या कृपेने त्या दोन्हींच्या तौलनिक अभ्यासाची जी सूत्रे माझ्या लक्षात आली, ती येथे दिली आहेत.

चामड्याच्या पट्ट्याचे घुंगरू
दोरीत गुंफलेले घुंगरू

१. चामड्याच्या पट्ट्याचे घुंगरू आणि दोरीत गुंफलेले घुंगरू यांच्यातील तौलनिक अभ्यासाची सूत्रे

२. नर्तकाचा भाव आणि आध्यात्मिक पातळी यांसंदर्भात लक्षात आलेली महत्त्वाची सूत्रे

होमिओपॅथी वैद्या सुश्री (कु.) आरती तिवारी

अ. वरील सूत्रे नर्तकाच्या ७० टक्के आध्यात्मिक पातळीपर्यंत लागू आहेत. ७० टक्के पातळीनंतर नर्तकाने कोणत्याही प्रकारचे घुंगरू बांधले तरी, त्यातून सात्त्विक स्पंदने येणे, दैवीतत्त्व आकृष्ट होणे, तसेच प्रक्षेपित होणे, अनुभूती येणे इत्यादी सर्व गोष्टी नर्तकाच्या अस्तित्वाने होतात.

आ. त्याचप्रमाणे नर्तकाचा भाव अधिक असल्यास पट्ट्याच्या घुंगरांसंदर्भातही वरील सारणीतील दैवी अनुभव / अनुभूती येऊ शकतात.

३. मखमली, तसेच कापडी गादीमध्ये गुंफलेल्या घुंगरांच्या तुलनेत दोरीमध्ये गुंफलेले घुंगरू अधिक सात्त्विक असणे

काही वेळा चौकोनी मखमली (वेलवेट) किंवा कापडी गादीप्रमाणे करून त्यावरही घुंगरू गुंफले जातात. त्या तुलनेतही दोरीत गुंफलेल्या घुंगरांमध्ये वरीलप्रमाणे अनुभव येण्याचे प्रमाण अधिक असते.’

– होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी, भरतनाट्यम् विशारद, फोंडा, गोवा. (२४.२.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक