समाजवादी पक्षाच्या (सपाच्या) अबू आझमी यांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे टीकास्त्र

मुंबई – सपा कि साप ? महाराष्ट्रात समाजवादी पक्षाच्या अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक करून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला. त्यामुळे महाराष्ट्र पेटवण्याचा हा कट होता का ?, असा संशय येतो; कारण आता समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. महाराणा संग्राम सिंह, राणा सांगा यांचा घोर अपमान केला आहे. बाबरला हिंदुस्थानात राणा सांगा यांनी आणले, असा नवा इतिहास त्यांनी संसदेत सांगितला. या बाबर आणि औरंग्याच्या औलादी आहेत. यांना देश पेटवायचा आहे. विकासाची सूत्रे यांना नको; मात्र चुकीचा इतिहास सांगून द्वेषाची ठिणगी टाकणार्या या पिलावळीला कायद्यानेच धडा शिकवायला हवा, असा घणाघात भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी केला.