केरी तपासणीनाक्यावर म्हशी आणि गायीची वासरे यांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई

प्रतिकात्मक छायाचित्र

वाळपई, २८ मार्च (वार्ता.) – वाळपई पोलिसांनी केरी तपासणीनाक्यावर म्हशी आणि गायीची वासरे यांच्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २ म्हशी आणि ४ वासरे कह्यात घेतली आहेत. २ संशयितांनाही कह्यात घेतले आहे. चारचाकी मालवाहू वाहनातून म्हशी आणि वासरे यांना गोव्यातून बेळगाव येथे नेण्यात येत होते. पोलिसांनी वाहन अडवले, तेव्हा वाहनचालकाकडे प्राण्यांच्या वाहतुकीसंबंधी आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली.