रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

 १. अधिवक्ता प्रणिता श्रीवास्तव, जमशेदपूर, झारखंड 

अ. ‘सुख आणि शांती यांची अनुपमेय अनुभूती आली.’

२. श्री. मानव शिवलालभाई बुद्धदेव (सचिव, श्री योग वेदांत सेवा समिती, अमरावती, महाराष्ट्र)

अ. ‘हिंदु राष्ट्राची अनुभूती आली.’  (२५.६.२०२४)

३. सारिका, नवी देहली

अ. ‘आश्रम पाहून सकारात्मक ऊर्जेची जाणीव झाली.

आ. आश्रमाला या स्तरावर आणण्यासाठी सनातनने पुष्कळ संशोधन आणि कष्ट घेतले आहेत.

इ. भगवंताने कधी संधी दिली, तर सेवेसाठी येण्याची इच्छा आहे.’

(सर्व सूत्रांचा दिनांक : २५.६.२०२४)

सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अिभप्राय  

१. सारिका, नवी देहली

अ. ‘हे प्रदर्शन पाहिल्यावर वाटले, ‘आपण कधी या सूक्ष्म गोष्टींकडे लक्ष दिले नाही.’

आ. ‘आपल्या जवळपास किती पालट होत असतात ?’, त्यांची जाणीव भगवंत आपल्याला प्रत्येक क्षणी करून देत असतो.’ (२५.६.२०२४)

१. श्री. मानव शिवलालभाई बुद्धदेव (सचिव, श्री योग वेदांत सेवा समिती, अमरावती, महाराष्ट्र)

अ. ‘हे प्रदर्शन पाहून साधना आरंभ करण्याची आणि ती निरंतर वाढवण्याची प्रेरणा मिळते.’ (२५.६.२०२४)

सनातनच्या आश्रमातील ‘संगीत’ आणि ‘संशोधन’ या विषयांवरील PPT (Power Point Presentation (टीप) पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय 

टीप – हे एक सॉफ्टवेअर (संगणकीय प्रणाली) असून यावर संबंधित विषयांची विविध वैशिष्ट्ये दाखवण्यात येतात.

१. श्री. मानव शिवलालभाई बुद्धदेव, अमरावती

अ. ‘नामजप केल्यानंतर तुळस आणि निवडुंग यांच्या जवळ तबलावादनाच्या प्रयोगाचा परिणाम पाहून माझ्या डोळ्यांत अश्रू आले.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक