‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर अनेक वेळा मला स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या प्रतिमेजवळ नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले आहे. त्या वेळी गुरुकृपेने सातत्याने माझ्याकडून ‘प.पू. बाबा, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी साधना होण्यासाठी मला बळ द्या’, अशी प्रार्थना होते.

वसंतपंचमी (२.२.२०२५) या दिवशी सायंकाळी मी स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेजवळ उभा राहून प्रार्थना करत होतो. तेव्हा काही क्षणांतच मला ‘सभोवती तेजोमय प्रकाश पसरला आहे’, असे जाणवले. मला अन्य काही दिसत नव्हते. मला प.पू. बाबांचे विशाल रूप दिसले आणि ‘ते मला काहीतरी सांगत आहेत’, असे वाटले. ‘ते काय सांगत आहेत’, ते मला समजले नाही. पुढच्याच क्षणी त्यांनी त्यांचा हात माझ्या मस्तकावर ठेवला. मी भावविभोर झालो. माझ्यासारख्या अज्ञानी जिवाला परमात्म्याची ही लीला कशी कळणार ? मी प्रयत्नपूर्वक भानावर येत शरणागतीने त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.
आश्रमात त्या वेळी चालू असलेल्या यज्ञाचा आध्यात्मिक लाभ होण्यासाठी मी सभागृहात गेलो. मला हलकेपणा जाणवत होता. मी रात्री घरी आल्यावर बराच वेळ मला त्या चैतन्यमय क्षणांची आठवण होऊन माझी भावजागृती होत होती.’
(‘वसंतपंचमी हा प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्यामधील तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने साधकाला त्यांच्या संदर्भात अनुभूती आल्या.’ – संकलक)
– श्री. दीपक रामचंद्र छत्रे, रायंगिणी, बांदोडा, फोंडा, गोवा. (१०.२.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |