धर्माभिमान असलेला ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर (वय १३ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. सोहम् उदय बडगुजर हा या पिढीतील एक आहे !

(‘वर्ष २०२५ मध्ये कु. सोहम् उदय बडगुजर याची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के आहे.’ – संकलक)

फाल्गुन कृष्ण चतुर्दशी (२८.३.२०२५) या दिवशी जळगाव येथील कु. सोहम् उदय बडगुजर याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई आणि वडील यांच्या लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. सोहम् उदय बडगुजर याला १३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

कु. सोहम् बडगुजर

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले 

१.  सौ. वेदांती बडगुजर (कु. सोहमची आई), जळगाव

१ अ. ‘सोहम् ला सेवाकेंद्रात रहाण्याची ओढ आहे.

सौ. वेदांती बडगुजर

१ आ. राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करण्याची आवड : एकदा सोहमच्या  शिक्षकांनी त्याला ‘तू मोठा झाल्यावर कोण होणार ?’, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा तो म्हणाला, ‘‘मी मोठा झाल्यावर वायूदलात (एअर फोर्समध्ये) जाणार आहे; कारण मला देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी सैनिक बनायचे आहे. मला एक चांगला साधकही बनायचे आहे. त्यामुळे मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांजवळ रहाता येईल.’’

१ इ. गुरूंप्रती भाव : सोहमने ‘त्याचे ध्येय आणि व्यष्टी साधनेचे करायचे प्रयत्न’ एका कागदावर लिहिले. तो अभ्यास करतो, त्या ठिकाणी त्याने तो कागद भिंतीवर लावला आहे. त्या कागदाच्या बाजूला त्याने परात्पर गुरुदेवांचे छायाचित्रही लावले आहे. तो त्या छायाचित्राकडे पाहून सतत परात्पर गुरुदेवांचे स्मरण करतो.’

२. श्री. उदय रवींद्र बडगुजर (कु. सोहमचे वडील), जळगाव 

२ अ. सेवेची ओढ 

१. डिसेंबर २०२३ मध्ये सोहम्च्या शाळेला सुटी असतांना आम्ही सिल्लोड (जिल्हा संभाजीनगर) येथील नातेवाइकांकडे गेलो होतो. त्याच वेळी सिल्लोड येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक अधिवेशन आयोजित केले होते. सोहमने अधिवेशनाच्या दिवशी त्याला सांगितलेली सेवा आनंदाने केली.

२. फेब्रुवारी २०२४ मध्ये जळगाव येथे अधिवक्त्यांसाठी अधिवेशन होते. त्या वेळी सोहमने या अधिवेशनाच्या पूर्वसिद्धतेची सेवा तळमळीने केली.

३. तो ‘साधक सेवा कशी करतात ?’, याचे निरीक्षण करतो आणि त्यांच्याकडून शिकतो.

श्री. उदय बडगुजर

२ आ. धर्माभिमानी

१. सोहमने ‘हलाल’ प्रमाणित उत्पादनांची माहिती जाणून घेतली. तो पेठेत गेल्यावर ‘हलाल’ चिन्ह असलेल्या वस्तू विकत घेण्याचे टाळतो. तो त्याची आई आणि आजी यांनाही याची आठवण करून देतो.

२. एकदा सोहमला  शाळेतील नाटकात मोगल बादशहाची भूमिका देणार होते. तेव्हा त्याने नाटकात भाग घेतला नाही. तो म्हणाला, ‘‘माझे कौतुक नाही झाले, तरी चालेल; पण मी मोगल बनणार नाही.’’

३. सत्संग किंवा हिंदु राष्ट्र-जागृती सभा यांमध्ये धर्माविषयी सांगितलेली सूत्रे तो दुसर्‍या दिवशी त्याच्या मित्रांना सांगतो आणि त्याविषयी त्यांच्याशी चर्चा करतो.

४. तो शाळेतील मित्र, त्यांचे पालक आणि शिक्षक यांना हिंदु राष्ट्र-जागृती सभेविषयी सांगतो अन् त्यांना सभेला येण्याचे निमंत्रण देतो.

५. सोहम् त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या शाळेच्या वाचनालयासाठी सनातनचे ‘धर्म आणि संस्कार’ यांविषयीचे ग्रंथ भेट देतो.

६. तो कपाळावर टिळा लावतो.

२ इ. गुरूंप्रती भाव 

१. तो पाणी पितांना ‘गुरुदेवांनी दिलेले तीर्थ ग्रहण करत आहे’, असा भाव ठेवतो.

२. तो परीक्षेच्या वेळी ‘गुरुदेव जवळ बसले आहेत’, असा भाव ठेवतो. ‘गुरुदेव नेहमी त्याच्या समवेत असतात’, असा त्याचा भाव असतो.

२ ई. सोहम्मध्ये जाणवलेले पालट : ‘सोहममध्ये ‘इतरांना साहाय्य करणे, सहनशीलता, प्रेमभाव, इतरांचा हेवा न करणे आणि हट्टीपणा न करणे’, हे गुण वृद्धींगत झाले आहेत’, असे माझ्या लक्षात आले.

२ उ. अनुभूती – परीक्षेच्या वेळी प्रार्थना केल्यावर प्रश्नाचे उत्तर आठवणे : एकदा सोहमला परीक्षेत एका प्रश्नाचे उत्तर आठवत नव्हते. त्या वेळी त्याने श्री गणेश आणि गुरुदेव यांना प्रार्थना केली अन् त्याला लगेच प्रश्नाचे उत्तर आठवले.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.३.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJckमार्गिकेवरही पाहू शकता.