उद्या चैत्र शुक्ल प्रतिपदा (गुढीपाडवा, ३०.३.२०२५) या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना त्यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी त्यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. सौ. जयंती परब, कुडाळ सेवाकेंद्र
१ अ. उन्हाळ्याचे दिवस असूनही आणि वीजपुरवठा खंडित होऊनही सद्गुरु सत्यवान कदम यांच्या सत्संगात थंडावा जाणवणे
‘मला उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होतो. एकदा दुपारी सद्गुरु सत्यवानदादांचा सत्संग होता. त्या वेळी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अधिकच उकडत होते. ‘वीजपुरवठा खंडित झाला असल्याने पंखा नसेल आणि मला सत्संगात बसणे शक्य होणार नाही’, या विचाराने मी त्रस्त होते; मात्र प्रार्थना करून सत्संगात सद्गुरु सत्यवानदादांनी बोलायला आरंभ केल्यावर ‘मला उकडत आहे’, याचे मला भानच राहिले नाही. ‘वीजपुरवठा खंडित झाला आहे’, हे मी विसरूनच गेले. मला वातावरणात गारवा जाणवू लागला. ‘सद्गुरु दादांमधील चैतन्याने वातावरणात कसा पालट होतो !’, हे मला प्रत्यक्ष अनुभवता आले आणि सत्संगातील चैतन्यही ग्रहण करता आले.
१ आ. सद्गुरु सत्यवानदादा वापरत असलेली गादी उन्हात ठेवत असतांना तिचा स्पर्श लहान बाळाच्या स्पर्शाप्रमाणे मुलायम जाणवणे

मी सद्गुरु दादा वापरत असलेली गादी उन्हात ठेवत असतांना मला त्या गादीचा स्पर्श लहान बालकाच्या मुलायम त्वचेप्रमाणे जाणवू लागला. मला त्या गादीमध्ये जिवंतपणा जाणवू लागला. मी ती गादी हातात धरल्यावर ‘लहान बाळालाच घेतले आहे’, असे मला वाटत होते. मला त्या गादीत एवढा जिवंतपणा जाणवत होता की, ‘ती गादी उन्हात ठेवू कि नको’, असे मला वाटत होते. ‘निर्जीव वस्तूंमध्ये एवढा जिवंतपणा आणणारे संत साधकांचे भविष्य नक्कीच उज्ज्वल करतील !’, यात तीळमात्र शंका नाही. माझ्या मनात ‘सर्व संत गुरुदेवांची वेगवेगळी रूपे आहेत’, असा विचार येऊन मी गादीच्या स्पर्शाचा आनंद अनुभवला.
१ इ. साधकांच्या व्यष्टी साधनेकडे लक्ष असणे
सद्गुरु सत्यवानदादा बाहेरून सेवा करून आल्यावर विश्रांती न घेता लगेच साधकांच्या स्वभावदोष सारणीच्या वह्या तपासतात. ते जसे प्रसारसेवेला प्राधान्य देतात, तेवढेच प्राधान्य ते साधकांच्या वह्या तपासायलाही देतात. त्यांनी साधकांच्या वहीतील प्रत्येक शब्द वाचलेला असतो. ते साधकांच्या वहीत योग्य दृष्टीकोन लिहितात.
१ ई. सद्गुरु सत्यवानदादांच्या समवेत बसून नामजप करतांना ध्यान लागणे आणि ‘त्या स्थितीतून बाहेर येऊच नये’, असे वाटणे
एकदा सेवाकेंद्रातील सर्व साधकांनी ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।’ हा नामजप सामूहिकरित्या करायचा होता. तेव्हा सद्गुरु सत्यवानदादा नामजप करत होते आणि त्यांच्या समवेत बसून साधकही नामजप करत होते. सद्गुरु दादांच्या समवेत बसून नामजप करत असतांना माझे ध्यान लागले. मला ‘त्या स्थितीतून बाहेर येऊच नये’, असे वाटत होते. सामूहिक नामजप झाल्यानंतर मी माझा वैयक्तिक नामजप करत होते. तेव्हा मी शांतीची अनुभूती घेत नामजप पूर्ण केला.
१ उ. सद्गुरु सत्यवानदादांच्या सत्संगात बसल्यावर ताण दूर होणे
एकदा मला एका प्रसंगाचा पुष्कळ ताण आला होता. त्या दिवशी सद्गुरु दादांच्या सत्संगात बसल्यावर मला वातावरणात हलकेपणा जाणवला. माझ्यावरील ताण दूर झाला. ‘माझ्या मनातील सर्व अडथळे आणि अडचणी सुटल्या आहेत’, असे वाटून मला आनंद जाणवला.
१ ऊ. ‘सद्गुरु सत्यवानदादा वापरत असलेला थर्मास आणि तांब्या यांतून चंदेरी किरण निघत आहेत’, असे मला जाणवते.
१ ए. एका साधकाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्याच्यासमवेत छायाचित्र काढले. त्या छायाचित्रात ‘सद्गुरु दादांच्या डोळ्यांची हालचाल होत आहे’, असे मला जाणवते.
२. सौ. मनीषा वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या संदर्भात आलेली अनुभूती
२ अ १. ‘कुडाळ सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वाराशी दोन देव उभे आहेत’, असे सूक्ष्मातून दिसणे आणि ‘त्या सद्गुरु सत्यवानदादांना नमस्कार करण्यासाठी थांबल्या आहेत’, असे जाणवणे : सद्गुरु सत्यवानदादा प्रतिदिन सेवाकेंद्राच्या अंगणात सकाळी किंवा सायंकाळी चालण्याचा व्यायाम करतात. एकदा मला सूक्ष्मातून दिसले, ‘कुडाळ सेवाकेंद्राच्या प्रवेशद्वाराशी दोन दिव्य तेजस्वी देव उभे आहेत. त्यांच्या वस्त्रातून पिवळ्या रंगाचे किरण प्रक्षेपित होत आहेत. ते नमस्काराच्या मुद्रेत होते आणि त्यांच्या चेहर्यावर अत्यंत शरणागतभाव जाणवत होता.’ माझ्या मनात ‘ते कुणाला नमस्कार करत असावेत’, असा विचार येत असतांनाच ‘सद्गुरु सत्यवानदादा त्या प्रवेशद्वाराजवळ पोचत आहेत’, असे मला दिसले. ‘सद्गुरु दादांना नमस्कार करण्यासाठी ते तिथे उभे आहेत’, असे मला जाणवले आणि मला मनोमन कृतज्ञता वाटली.
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १६.३.२०२५)
कृतज्ञता राहो सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी ।
देऊनी नामजपादी उपायांची शिदोरी ।
अनिष्ट शक्तींच्या त्रासापासून आम्हा तारती ।। १ ।।

असे सद्गुरु (टीप १) लाभले कुडाळ सेवाकेंद्री ।
त्यांच्या आध्यात्मिक साैंदर्यांचे करतो गुणगान आम्ही ।। २ ।।
त्याग, संयम अन् सहजता या गुणांची असे ती मूर्ती ।।
साक्षीरूपे आम्हा न्याहाळती ।। ३ ।।
करू त्यांच्या दिव्य रूपाची मनोमन आरती ।
चैतन्याची उधळण करती आम्हावरी ।। ४ ।।
सगुणरूपी प.पू गुरुदेवांना (टीप २) असती देहाच्या मर्यादा ।
सद्गुरूंच्या माध्यमे अवतरती ते सदा ।। ५ ।।
कृतज्ञता राहो त्यांच्या चरणी ।
आमच्या मनी क्षणोक्षणी ।। ६ ।।
टीप १ – सद्गुरु सत्यवान कदम
टीप २ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– सौ. मनीषा वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|