छत्रपती संभाजी महाराजांना दिलेला मृत्यूदंड शरियतनुसार !

छत्रपती संभाजी महाराज

मुकर्रबखानाने छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर त्यांना कोणत्या कारणासाठी मृत्यूदंड सुनावण्यात आला, याची माहिती औरंगजेबाचा अधिकृत दरबारी इतिहास असलेल्या आणि साकी मुस्तैदखानाने लिहिलेल्या‘ मआसिर-ई आलमगिरी’ या ग्रंथात मिळते.

श्री. सत्येन वेलणकर

छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केल्यानंतर मोगल बादशाह औरंगजेब याने काझींची एक समिती नियुक्त केली. छत्रपती संभाजी यांना कोणती शिक्षा करावी ? याविषयीचा अभिप्राय या समितीला देण्यास सांगितले. तो अभिप्राय ‘मआसिर-ई आलमगिरी’ या ग्रंथात पृष्ठ ३२४-३२५ नोंदवलेला आहे आणि तो फार्सी भाषेत असून त्याचे भाषांतर पुढीलप्रमाणे आहे.

‘इस्लामी शहरे लुटून (नहब व गारत-ई-बिलाद-ई-इस्लाम) आणि मुसलमानांची कत्तल करून किंवा त्यांना बंदी बनवून (कत्ल व इसर-ई मुस्लमानान) जे पाप या घाणेरड्या धर्माच्या (म्हणजे हिंदु धर्माच्या) आणि नरकात जाणेच ज्याच्या नशिबात आहे, अशा या काफिराने (म्हणजे संभाजी महाराज – या सर्व शिव्या मोगलांनी छत्रपती संभाजी महाराज यांना दिलेल्या आहेत) केले होते ते बघता, त्याला जिवंत ठेवण्याच्या कारणांवर विचारविनिमय झाला. शरियतवर (इस्लामी कायदा) आधारित फतव्याप्रमाणे राज्यातील मान्यवर आणि इस्लामी कायद्याचे जाणकार यांनी या युद्धखोर चोराला (काती उल तरीक) नरकात धाडणेच योग्य होईल, असे ठरवले. त्यामुळे २१ जमाद-उल-अव्वल जुलूस ३२ ला बादशाह कोरेगावला (ज्याला फतहबाद म्हणून ओळखले जाते ) आल्यावर त्याला (छत्रपती संभाजी महाराज यांना) कवी कलश याच्यासह काफिरांना ठार मारणार्‍या तलवारीच्या साहाय्याने सर्वांत खोल अशा नरकात धाडले. त्याच्या मृत्यूची तारीख ‘काफ़िर बच्चा जहन्नमी रफ़्त’, म्हणजे नरक नशिबी काफिराचा मुलगा नरकात गेला’, या कालश्लेषाच्या साहाय्याने लिहिली गेली.’ (जे लोक ‘छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मनुस्मृतीनुसार केली गेली’, ते आतातरी हे सत्य स्वीकारण्याचे धाडस दाखवतील का ? – संपादक)

– श्री. सत्येन सुभाष वेलणकर, पुणे. (१७.३.२०२५)