Pakistan – Balochistan Tension : बलुचिस्तानात बलूच स्वातंत्र्यसैनिकांचे वर्चस्व : पाक सैन्याची पकड सैल !

इस्लामाबाद – पाकिस्तानचा सर्वांत मोठा प्रांत असलेला बलुचिस्तान आता त्याच्या गळ्यातील फास बनत चालला आहे. बलुचिस्तानात बलूच स्वातंत्र्यसैनिकांचे वर्चस्व वाढले आहे, तर पाक सैन्याची पकड सैल झाली आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याची पकड आता बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टापुरती मर्यादित आहे. आता कुणालाही या भागात प्रवेश करण्यासाठी बलूच स्वातंत्र्यसैनिकांची अनुमती घ्यावी लागते.

१. पाकिस्तानला त्याच्या एका प्रांतात इतक्या मोठ्या बंडाचा सामना करावा लागण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००९-१० मध्ये खैबर पख्तूनख्वाच्या आदिवासी भागात हे दिसून आले होते, जेव्हा ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी)ने अनेक भाग कह्यात घेतले होते.

२. बलुचिस्तानमध्ये मानवाधिकार कार्यकर्ते मेहरंग बलोच यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी १० सहस्र महिला रस्त्यावर उतरल्या.

३. क्वेट्टामध्ये बलूच स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या आक्रमणात २ पोलिसांसह ३ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण घायाळ झाले.

४, बलूच स्वातंत्र्यसैनिकांच्या आक्रमणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर चीनने पहिल्यांदाच बलुचिस्तानमध्ये त्याच्या कामगारांच्या संरक्षणासाठी खासगी सुरक्षादल तैनात केले आहे.

५. ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ने (‘बी.एल्.ए.’ने) या चळवळीला पाठिंबा दिला आहे. यासमवेत ‘बी.एल्.ए.’ला आता सामान्य जनतेचाही पाठिंबा मिळत आहे.