‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे फेब्रुवारी २०२१ पर्यंत सनातन संस्थेच्या गोव्यातील रामनाथी आश्रमातील एका खोलीत निवासाला होते. त्यानंतर पुढे ३ वर्षे ते किंवा अन्य कुणीही त्या खोलीत वास्तव्याला नव्हते; पण त्या खोलीची नियमित स्वच्छता केली जात होती. महर्षींच्या आज्ञेने फेब्रुवारी २०२४ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ या त्या खोलीमध्ये निवासासाठी गेल्या. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ खोलीमध्ये रहायला जाण्यापूर्वी त्या खोलीची पूजा करण्यात आली. या खोलीच्या छायाचित्रांचे ‘यू.ए.एस्.’(युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर) उपकरण आणि लोलक यांद्वारे संशोधन करण्यात आले. ‘यू.ए.एस्.’ उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. हे संशोधन पुढे दिले आहे.

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी निवास करत असलेल्या खोलीतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ होत जाणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले पूर्वी निवास करत असलेल्या खोलीतील कोणत्याही छायाचित्रात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या छायाचित्रांत उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.


टीप – ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यासाठी चाचणीस्थळी अधिकाधिक २.३ किलोमीटर एवढीच जागा उपलब्ध होती. त्यामुळे त्यापुढे अचूक प्रभावळ मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची चैतन्यमय स्पंदने अजूनही खोलीत टिकून असणे : फेब्रुवारी २०२१ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर या खोलीत निवास करत नाहीत. असे असूनही फेब्रुवारी २०२४ मध्ये, म्हणजे ३ वर्षांत खोलीतील सकारात्मक ऊर्जेत उत्तरोत्तर पुष्कळ प्रमाणात वाढ होऊन ती ७२.१ किलोमीटर झाली. याचे कारण हे की, सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची चैतन्यमय स्पंदने अजूनही या खोलीत टिकून आहेत. एवढेच नव्हे, तर काळानुरूप त्यांच्यातील (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील) चैतन्यात जसजशी वाढ होत आहे, तसतशी खोलीतील चैतन्यातही वाढ होत आहे. याचे कारण म्हणजे खोली पूर्वीची सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांची खोली असल्याने त्यांचे तत्त्व अजूनही त्या खोलीत आहे. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील चैतन्यात काळानुरूप वाढ झाल्यावर खोलीतील चैतन्यातही आपोआपच वाढ झाली. हे भौतिकशास्त्रातील ‘रेझोनन्स इफेक्ट’ (दोन समान गुणधर्माच्या तारा समोरासमोर असतांना त्यांपैकी एक तार छेडली असता ती कंपन पावते आणि तेव्हा दुसरी तारही पहिल्या तारेप्रमाणेच आपोआप कंपन पावते.) यामुळे घडते.

१ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी खोलीत श्री गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे) छायाचित्र ठेवून भावपूर्ण पूजन केल्यानंतर खोलीतील चैतन्यात भरीव वाढ होणे : फेब्रुवारी २०२४ पासून या खोलीत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ निवास करत आहेत. तेथे निवासाला जाण्यापूर्वी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी खोलीत श्री गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे) छायाचित्र ठेवून भावपूर्ण पूजन केले. पूजेनंतर खोलीतील चैतन्यात भरीव वाढ होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा ११८.३ किलोमीटर झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी केलेल्या भावपूर्ण पूजनामुळे श्री गुरूंचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत झाले. याचा सकारात्मक परिणाम खोलीवर झाला.

१ इ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील भावामुळे खोलीतील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : फेब्रुवारी २०२४ पासून या खोलीत श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ निवासाला गेल्यानंतर १ महिन्याने (मार्च २०२४ मध्ये) खोलीतील सकारात्मक ऊर्जेत वाढ होऊन ती ११८.३ किलोमीटरची १७२ किलोमीटर झाली. हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचे कारण हे की, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील भावामुळे खोलीतील चैतन्यात पुष्कळ प्रमाणात वाढ झाली.
१ ई. श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील अवतारी तत्त्व (श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व) अधिकाधिक कार्यरत होणे : वरील नोंदींतून असे लक्षात येते की, वर्ष २०१६ ते २०२० म्हणजे साधारण ५ वर्षांत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर स्वतः स्थुलातून खोलीत वास्तव्याला असतांनाही खोलीतील सकारात्मक ऊर्जा केवळ दुपटीने वाढून १ किलोमीटर झाली. याउलट २०२१ ते जानेवारी २०२४ पर्यंत म्हणजे अनुमाने ३ हून अधिक वर्षे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर त्या खोलीत स्थुलातून वास्तव्याला नसतांनाही खोलीतील सकारात्मक ऊर्जा अनेक पटींनी वाढून ती ७२.१ किलोमीटर झाली. विशेष म्हणजे फेब्रुवारी २०२४ पासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई या खोलीत निवास करू लागल्यावर अवघ्या १ महिन्यात खोलीतील सकारात्मक ऊर्जा वाढून १७२.८ किलोमीटर झाली. हे श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्री महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील अवतारी तत्त्व (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यातील श्री महालक्ष्मीदेवीचे तत्त्व) अधिकाधिक कार्यरत होत असल्याचे द्योतक आहे.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.२.२०२५)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ हे भगवंताचे अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. ‘सनातन प्रभात’च्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही या अंकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |