‘उभादांडा (जिल्हा सिंधुदुर्ग) गावात काही जणांनी गुरांना रात्रंदिवस मोकाट सोडलेले असते. ही मोकाट गुरे भाजीपाला आणि शेती यांची हानी करत आहेत. याविषयी संबंधित गुरांच्या मालकांना सांगूनही त्यात काही सुधारणा होतांना दिसत नाही. याउलट गुरांचे मालक शेतकर्यांनाच दमदाटी करत आहेत. यामुळे गुरांच्या अशा मालकांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक संदीप भोसले आणि सरपंच नीलेश चमणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.’ (२४.३.२०२५)