Donald Trump Iftar Party : ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये केले इफ्तार पार्टीचे आयोजन !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाठिंबा दिल्याविषयी त्यांनी अमेरिकन मुसलमानांचे आभार मानले.

‘मी राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत तुमच्यासमवेत राहीन’, असे आश्वासन ट्रम्प यांनी मुसलमानांना दिले. मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचाही ट्रम्प यांनी उल्लेख केला. माझ्या प्रयत्नांमुळेच तेथे शांतता प्रस्थापित झाली, असे त्यांनी सांगितले. ट्रम्प यांनी वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते; पण त्यानंतर कोरोना साथीमुळे इफ्तार पार्टी आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली. ट्रम्प यांनी या वर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ होती.