भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी ! – संयुक्त राष्ट्रे
असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !
असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते.
धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !
आम्ही कोरोनाकाळात श्रमिकांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध केली. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्याही चालू केल्या आहेत. दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू चालू करत आहोत. कोल्हापूर- वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात चालू करण्याचा प्रयत्न आहे.
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीविषयी चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता कि घातपात हे स्पष्ट होईल. त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य रहाणार नाही, असे नमूद करतांनाच ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांचे पूर्ण दायित्व आस्थापनाने घेतले आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे; मात्र अनेक तक्रारी केल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, असा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे.
राजधानी पणजी येथे १६ जानेवारीपासून चालू होणार्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (‘आंचिम’चे) कन्नड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि गायक सुदीप संजीव आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पहाता त्यांनी तात्काळ त्यागपत्र द्यायला हवे. भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्या वतीने कालच एक पत्रक प्रसिद्ध करून मुंडे यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात आली आहे.
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथे हिंदु महासभेकडून ‘गोडसे ज्ञानशाळा’ प्रारंभ करण्यात आली असून त्याद्वारे पंडित नथुराम गोडसे यांचे विचार युवकांपर्यंत पोचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.