हिंदुद्वेषी तृप्ती देसाई यांच्या शबरीमला मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाचा फज्जा : केरळ विमानतळावरूनच पुण्यात परत !

हिंदूंचा विरोध झुगारून शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाचा फज्जा उडाला. देसाई या १६ नोव्हेंबरला पहाटे कोची विमानतळावर येताच त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले.

शबरीमला मंदिर मे प्रवेश की इच्छा रखनेवाली तृप्ती देसाई को हिन्दुआें के विरोध के कारण वापस जाना पडा !

हिन्दुओ, हिन्दु-संगठन की शक्ति जानो !

हिंदूंनो, संघटनाची शक्ती ओळखून धर्मरक्षणासाठी कटीबद्ध व्हा !

शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी केरळला गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांना हिंदु भाविकांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे त्यांना काही घंटे विमानतळावरच थांबून पुण्यात परतावे लागले.

१७ नोव्हेंबरला शबरीमला मंदिरात जाण्यासाठी तृप्ती देसाई यांचे केरळच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी १७ नोव्हेंबरला शबरीमला मंदिरात जाणार असून त्यासाठी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन् यांना पत्र लिहिले आहे.

कथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई पुणे पोलिसांच्या कह्यात !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौर्‍याच्या वेळी शबरीमला सूत्रावरून त्यांचा ताफा अडवण्यासाठी निघालेल्या कथित स्त्रीवादी कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी कह्यात घेतले.

सातारा येथे भूमाता ब्रिगेडच्या खंडणीबहाद्दर माधुरी टोणपे यांना अटक

कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. अशोकराव पाटील-पोतलेकर यांच्याकडे अनैतिक संबंधांवरून भूमाता ब्रिगेडच्या खंडणीबहाद्दर पदाधिकारी माधुरी टोणपे हिने अपकीर्तीची धमकी देत १० लक्ष रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच एका सदनिकेची (फ्लॅटची) मागणी करून आत्महत्येसही प्रवृत्त केले होती.

(म्हणे) ‘पत्नीपीडित पुरुषांनी लोकशाही मार्गाने त्यांच्या मागण्या शासनाकडे मांडाव्यात !’

आयोजकांच्या स्टंटबाजीला बळी न पडता पत्नीपीडित पुरुषांनी लोकशाही मार्गाने त्यांच्या मागण्या शासनाकडे मांडाव्यात, असे आवाहन देसाई यांनी केले.

(म्हणे) ‘माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याची शक्यता !’

मंदिरात जातांना कोणत्या कपड्यात जावे, याचे ज्ञान भक्तांना आहे. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय पोवार, संगीता खाडे, वैशाली क्षीरसागर आणि अन्य सदस्य अधिकाराचा भंग करत आहेत.

कोल्हापूरकर भाविकांच्या संघटनशक्तीमुळे तृप्ती देसाई यांची स्टंटबाजी हवेत विरली !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री महालक्ष्मी मंदिरात प्रवेश करतांना ‘ड्रेस’कोडविषयी भाविकांना केलेले आवाहन १० ऑक्टोबरअखेर मागे न घेतल्यास देवस्थान समितीचे अध्यक्षयांना चोप देण्याची भाषा करणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या आंदोलनाचा बार अखेर फुसकाच निघाला.

तृप्ती देसाई यांना घटस्थापना ते पौर्णिमेपर्यंत श्री महालक्ष्मी मंदिर प्रवेश मज्जाव करावा !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री महालक्ष्मी भाविकांनी मंदिरात प्रवेश करण्याच्या संदर्भात तोकडे कपडे परिधान न करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.


Multi Language |Offline reading | PDF