राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील महिला आरोपीचे सुटकेसाठी उपोषण

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन् हिने स्वतःच्या आणि तिचा पती मुरुगन यांच्या सुटकेसाठी २५ ऑक्टोबरपासून उपोषण चालू केले आहे. याविषयी नलिनी हिने नेल्लोर कारागृहाच्या अधिकार्‍यांना पत्र लिहून तसे कळवले आहे.