मार्गांच्या विस्तारीकरणासह अन्य कामांसाठी रेल्वेला साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांच्या विस्तारीकरणासह अपघातप्रवण भागातील विशेष उपाययोजनांसाठी रेल्वेला साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे.

लोकलमध्ये महिलांची छळवणूक होत असल्याचा सर्वेक्षणातून निष्कर्ष

समाजकंटकांकडून होणारा छळ रोखण्यासाठी महिलांनीही स्वरक्षण प्रशिक्षण घेऊन सक्षम व्हावे !

रेल्वेगाड्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस कर्मचार्‍यांची गस्त

महिलांसाठी गस्त वाढवली, ही योजना स्तुत्यच आहे. रामराज्यात महिला पूर्णतः सुरक्षित होत्या. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नीतीमान समाजनिर्मितीसाठी रामराज्याची स्थापना होणे अपरिहार्य आहे.

पुणे येथे रेल्वेच्या वाहनतळाजवळ हॅण्डग्रेनेडसदृश वस्तू सापडली

येथील ताडीवाला मार्गावरील रेल्वेच्या वाहनतळाच्या मागील रस्त्यावर एक हॅण्डग्रेनेडसदृश वस्तू सापडली. याची माहिती मिळताच पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने ती मोकळ्या जागेत नेऊन स्फोट घडवून नष्ट केली.

रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम लांबल्याने प्रगती एक्स्प्रेससह अनेक गाड्या रहित

लोणावळ्याजवळील कर्जत ते मंकी हिल परिसरात या वर्षी अतीवृष्टी झाल्यामुळे मुंबई ते पुणे रेल्वे मार्गाची हानी झाली आहे. त्यामुळे कर्जत ते मंकी हिलदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबईकडून नागपूरकडे जाणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये अवैध गुटखा विक्री !

मानवी आरोग्यास हानिकारक असणार्‍या गुटकाजन्य पदार्थाची विक्री करण्यास राज्यात बंदी असतानांही मुंबईकडून नागपूरकडे जाणार्‍या रेल्वे गाड्यांमध्ये अवैधरित्या विमल गुटखा’ अवैधरित्या विकला जात आहे.

टिकटॉक व्हिडिओ बनवणार्‍या धर्मांधांना अटक

हार्बर रेल्वे मार्गावरून टिळकनगर स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणार्‍या लोकलगाडीच्या दरवाजावर लटकून टिकटॉक व्हिडिओ बनवून सामाजिक प्रसारमाध्यमांवर….

भारतीय रेल्वेला यात्रेकरूंकडून मिळणार्‍या नफ्यात १५५ कोटी रुपयांची तूट

यंदाच्या म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षात रेल्वेच्या नफ्यात तूट आली आहे. पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसर्‍या तिमाहीमध्ये यात्रेकरूंच्या भाड्यातून मिळणारा नफा १५५ कोटी रुपयांनी न्यून झाला असून, मालाच्या भाड्यातून मिळणारा नफा ३ सहस्र ९०१ कोटी रुपयांनी न्यून झाला आहे.