सोलापूर येथे ५ वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई ‘फ्रॅन्सिस पिंटो’कडून अत्याचार !

सोलापूर – महापौर बंगला परिसरातील शाळेत बालवाडीत शिकत असलेल्या ५ वर्षांच्या मुलीवर त्याच शाळेतील ५५ वर्षांचा ‘फ्रॅन्सिस पिंटो’ नावाचा शिपाई गेली ६ महिने स्वच्छतागृहाजवळ नेऊन अत्याचार करत होता. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यावर आईने विश्वासात घेऊन विचारले, तेंव्हा मुलीने घडलेला प्रकार सांगितला. (अत्याचारामुळे बालवयातील मुलीच्या मनावर झालेल्या आघाताची भरपाई कशी होणार ? अशांना कठोर शिक्षा द्यायला हवी ! – संपादक) पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात प्रविष्ट केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता या गुन्ह्याचे अन्वेषण साहाय्यक आयुक्तांकडे दिले आहे. आरोपीची सखोल चौकशी करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवून घेणार असल्याचे तसेच मुलीची वैद्यकीय चाचणी करणार असल्याचे अन्वेषण अधिकारी गवारी यांनी सांगितले.