भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी  ! – संयुक्त राष्ट्रे

असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास तो संपूर्ण जगासाठी विनाशकारी ठरू शकतो, अशी चेतावणी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंतोनिया गुटरेस यांनी दिली आहे. काश्मीरमधील परिस्थितीविषयी पाकच्या पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

गुटरेस म्हणाले की,

१. नियंत्रणरेषेवर तणाव न्यून होणे आवश्यक आहे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन देशांतील समस्यांविषयी चर्चा करून त्या सोडवण्यावर भर दिला पाहिजे.

२. माझ्या मते दोन्ही देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. मानवाधिकारांचेही संरक्षण आणि सन्मान झाला पाहिजे. सध्या काही गोष्टी अतिशय सकारात्मकपणे पुढे जात आहेत. अशा अनेक समस्या आहेत, ज्यांचा तोडगा सैनिकी कारवाईने करता येणार नाही.