कोणताही गर्भपात नसल्याचे पोलिसांचे म्हणणे !
दौंड (पुणे) – शहरातील कचराकुंडीमध्ये मृत पुरुष जातीचे अर्भक आणि मानवी शरिराचे अवयव सापडले. या गंभीर घटनेची पोलिसांनी नोंद घेत पंचनामा केला. संबंधित रुग्णालय प्रशासनाची चौकशी करून अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कचराकुंडीमध्ये सापडलेल्या कागदी खोक्यावर ‘भंगाळे हॉस्पिटल’चा उल्लेख असून पोलीस अधिकचे अन्वेषण करत आहेत.
भंगाळे हॉस्पिटलच्या आधुनिक वैद्यांकडे चौकशी केली. तेव्हा ११ बरण्यांमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतरचे अवयव ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयातील इतर ११ बरण्यांवर असलेल्या संबंधित रुग्णांच्या नावाची कागदपत्रे पोलिसांकडे सादर करण्यात आली, तसेच हे अर्भक वैद्यकीय अभ्यासासाठी बरणीमध्ये गोठवून ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलीस अन्वेषणातून समोर आली आहे.
अन्वेषणानंतर कोणत्याही प्रकारचा गर्भपात झालेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अर्भक अभ्यासासाठी जरी आणले असले, तरी अशा पद्धतीने ते कचर्यामध्ये टाकता येत नाही. ज्याने कुणी मृत अर्भक अशा प्रकारे टाकले, त्याचा पोलीस शोध घेत आहेत.