सामाजिक न्यायमंत्री  धनंजय मुंडे यांनी तात्काळ त्यागपत्र द्यावे ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

डावीकडून धनंजय मुंडे आणि चंद्रकांत पाटील

कराड, १३ जानेवारी  – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेले लैंगिक शोषणाचे आरोप पहाता त्यांनी तात्काळ त्यागपत्र द्यायला हवे. भारतीय जनता पक्षाच्या महिला शाखेच्या वतीने कालच एक पत्रक प्रसिद्ध करून मुंडे यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात आली आहे. ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप होतात, त्या व्यक्तीला पदावर रहाण्याचा नैतिक अधिकार नसतो; मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि सरकार याविषयी आत्मपरीक्षण करतील किंवा त्यागपत्र देतील असे वाटत नाही. यासाठी भाजपच्या वतीने आम्ही राज्यभर उठाव करणार आहोत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येथे आले होते, तेव्हा पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर – याच मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी १३ जानेवारी या दिवशी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्या त्यागपत्राची मागणी केली. त्यागपत्र न घेतल्यास भाजप रस्त्यावर उतरेल, अशी चेतावणी त्यांनी दिली.