गोव्यामध्ये नौदलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक सुरक्षित

गोव्यातील वेर्णा येथे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नौदलाचे ‘मिग-२९ के’ हे लढाऊ विमान कोसळले. विमानातील कॅप्टन एम्. शोकंद आणि लेफ्टनंट कमांडर दीपक यादव हे दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या माध्यमांतून बाहेर पडल्याने ते बचावले. वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीकडील पठारावर हे विमान कोसळले आणि ते नष्ट झाले.

आणखी किती वर्षे असे अपघात होत राहणार ?

गोव्यातील वेर्णा येथे नौदलाचे ‘मिग-२९ के’ हे लढाऊ विमान कोसळले. या वेळी विमानातील दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या माध्यमांतून बाहेर पडल्याने ते बचावले.

केईएममधील विद्युत् उपकरणांच्या दुरुस्तीच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

केईएम् रुग्णालयामधील विद्युत् उपकरणांच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. नुकतेच केईएम् रुग्णालयात ईसीजी यंत्रातील शॉर्टसर्किटच्या घटनेत एक बालक घायाळ झाले. यावरून हा प्रकार समोर आला.

देहलीत चार मजली कारखान्याला भीषण आग, २८ बंब घटनास्थळी

येथे एका चार मजली कारखान्याला ३ नोव्हेंबरच्या रात्री आग लागली. या आगीत मोठी हानी झाल्याची माहिती मिळाली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे २८ बंब घटनास्थळी दाखल झाले होते.

भेंडी बाजार (मुंबई) येथील इमारतीला भीषण आग

भेंडी बाजारातील इस्माईल या इमारतीला पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली. या इमारतीच्या जवळ वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या १० दुचाकी आणि दोन चारचाकी जळून खाक झाल्या.

देशभरात पाऊस आणि पूर यांमुळे २ सहस्र १५५ जणांचा मृत्यू, तर ४५ जण बेपत्ता

२२ राज्यांमध्ये पावसामुळे २६ लाखांहून अधिक लोक प्रभावित