पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात चूक काय ?

हिंदू कधीही दुसर्‍याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. हिंदूंचेच धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करत असल्यामुळे हिंदूंनाच दोषी ठरवले जात आहे.’’

पाश्‍चिमात्य शक्तींनी चुकीचा इतिहास आमच्यावर लादला ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

आमच्या इतिहासातील बहुतांश भाग हा पाश्‍चिमात्यांच्या प्रचाराचाच एक भाग आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या प्रकाराला आव्हान दिल्याने त्यांच्यावर क्रूरपणे अत्याचार करण्यात आले. त्यांच्या विरोधात खोटी माहिती प्रसारित करण्यात आली.

विजेचे ‘प्रिपेड मीटर’ बसवण्याची गोवा शासनाची संकल्पना

विजेची देयके देण्यास विलंब होतो. ‘मीटर रिडर’ना निवडणुका किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे काम दिल्याने विजेची देयके उशिरा देण्यात येतात, असे लक्षात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून हे विजेचे ‘प्रिपेड मीटर’ !

गोव्यात मंत्र्यांच्या शपथविधीवर साडेपाच कोटी रुपये खर्च

राज्याची आर्थिक स्थिती कोरोना महामारीच्या काळात खालावलेली असल्याचे लक्षात घेऊन शपथविधीवरील खर्च अल्प केला असता, तर ते जनतेला आवडले असते !

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट

‘‘या भेटीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खाण, पर्यटन, मोपा विमानतळ आणि महामार्गाचे बांधकाम या विषयांवर चर्चा केली. गोवा राज्य देशाची पर्यटन राजधानी बनवण्यासाठी केंद्राच्या सहकार्याची आवश्यकता आहे. खाणी चालू करण्यास अनुमती मिळाल्यानंतर लवकरच खाणींची निविदा काढण्यात येणार आहे.’’

गोवा सरकारने मराठीला राजभाषेचा दर्जा द्यावा !

‘‘एक सहस्र वर्षांपासून गोव्यातील जनतेची भाषा ही मराठी आहे. पोर्तुगीज काळातही सामान्य समाज सर्व व्यवहार मराठीतूनच करत होती. १९ व्या आणि २० व्या शतकात गोव्यात मराठी वाङमयाची निर्मिती झाली. गोव्यात आजही १० हून अधिक मराठी वृत्तपत्रे आहेत.

गोव्यात ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट करमुक्त करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता

हिंदूंवरील अत्याचाराला वाचा फोडणारा चित्रपट करमुक्त करणार्‍या गोव्यातील भाजप शासनाचे अभिनंदन !

उद्योगाचा विस्तार करण्यासाठी काही पंचायती लाच मागत असल्याने सरकारने उद्योगांसाठी ‘एक खिडकी’ योजना राबवावी ! – दामोदर कोचकर, अध्यक्ष, गोवा राज्य औद्योगिक संघटना

दामोदर कोचकर यांना अशी मागणी करावी लागणे, यावरून राज्यात भ्रष्टाचार किती तळागाळात पसरला आहे ? हे लक्षात येते !

(म्हणे) ‘गोव्यात कुठल्या चर्चमध्ये धर्मांतर केले जाते ? हे मला दाखवा !’

मायकल लोबो यांची पत्नी आमदार असलेल्या शिवोली मतदारसंघातच धर्मांतर होत आहे ! याविषयी अंकित साळगांवकर यांनी न्यायालयात पुराव्यांसह याचिका प्रविष्ट केली आहे.

वनहक्कासंबंधीची अंदाजे १० सहस्र प्रकरणे प्रलंबित रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

‘गोव्यातील भाजप शासन वनहक्कासंबंधीची अंदाजे १० सहस्र प्रलंबित प्रकरणे आणि सर्व प्रलंबित मुंडकार (कुळ) कायद्याखालील प्रकरणे पुढील ५ वर्षांत निकालात काढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.’