भारतातील आतंकवादी कारवाया आणि त्यावरील एकमात्र उपाययोजना !

जगाच्या इतिहासातून, तसेच नकाशातून पाकिस्तानचे नावच पुसून टाकले पाहिजे. यातच भारताचे सौख्य सामावले आहे. सध्याचे राष्ट्रप्रेमी सरकार ही कृती निश्चितच करू शकते. याविषयी पाठपुरावा करण्याचे काम आपण नागरिकांनी आवर्जून करायला हवे.

(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्र मानवाधिकार संघटनेमध्ये काश्मीरच्या लोकांना समर्थन देत राहू !’ – ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामी कोऑपरेशन (ओ.आय.सी.)

पाकिस्तानच्या दबावातून अशा प्रकारचे विधान करून ‘ओ.आय.सी.’ केवळ पाकला खुश करण्यापलीकडे काहीही साध्य करू शकत नाही; कारण काश्मीर भारताचे अविभाज्य अंग आहे. त्यामुळे कुणी कितीही बाता मारल्या, तरी त्यात पालट होऊ शकणार नाही, हे ‘ओ.आय.सी.’सारख्या संघटनांनी लक्षात ठेवावे !

संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये भारताने पाक आणि इस्लामी देशांची संघटना यांना फटकारले !

अशा शाब्दिक फटकार्‍यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. त्याला समजेल अशाच भाषेत भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक !

पाकचे पंतप्रधान इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमध्ये २ जनमत चाचण्या घेणार !

‘भारतात रहायचे कि पाकमध्ये ?’आणि ‘पाकमध्ये रहायचे कि स्वतंत्र काश्मीर हवे ?’ याविषयी जनमत चाचण्या घेणार

भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी  ! – संयुक्त राष्ट्रे

असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !

पाकने मलेशियामध्ये जप्त केलेल्या विमानाच्या भाड्याची ५१ कोटी रुपये रक्कम फेडली !

मलेशियाने पाकच्या ‘पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलाइन्स’चे बोईंग ७७७ हे विमान काही दिवसांपूर्वी भाड्याची रक्कम न दिल्याने जप्त केले होते. आता पाकने लंडन उच्च न्यायालयात, ‘आयरिश जेट आस्थापनाला ५१ कोटी रुपये दिले आहेत’, असे सांगितले.

कट्टरतावाद्यांकडून हिंदूंचे मंदिर तोडले जात असतांना पाक सरकार मूकदर्शक होते !

अशा टीका-टिप्पण्यांचा पाकवर काहीही परिणाम होणार नाही. भारताने त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक !

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे जाणा !

जिहादी आतंकवादी संघटना अल् कायदाच्या अरब देशांतील शाखेने भारतीय मुसलमान आणि त्यांच्यातील विद्वान यांना ‘मुसलमानांशी भेदभाव होत असल्याने भारताच्या विरोधात शस्त्र हातात घेऊन जिहाद करण्यासाठी संघटित व्हा’, असे हिंदुद्वेषी आवाहन केले आहे.