
मुंबई – छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण असलेली पुस्तके, नाटके, चित्रपट अशा कलाकृतींवर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत केली आहे. यामध्ये विकिपीडिया, यू ट्यूब आणि अन्य सामाजिक माध्यमांवरील महापुरुषांविषयीच आक्षेपार्ह लिखाण काढण्याचे निर्देश दिले आहेत. ‘राजसंन्यास’ ही राम गणेश गडकरींची कादंबरी, ‘थोरातांची कमळा’, ‘बेबंदशाही’, ‘इथे ओशाळला मृत्यू’ अशी नाटके आणि चित्रपटे यांचा यात समावेश आहे.
छत्रपती संभाजी महाराजांविषयी ग्रंथसंपदा प्रकाशित करण्यासाठी इतिहास संशोधकांची समिती नेमण्याविषयी सकारात्मक असून यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागासमवेत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. अशा पद्धतीने साहित्यावर बंदी घातली गेली, तर एक काळ गाजवलेल्या साहित्यकृती कायमच्या नष्ट होतील. यामध्ये वसंत कानिटकर, राम गणेश गडकरी यांची ऐतिहासिक नाटकेही आहेत, हे सूत्रही विचारात घ्यायला हवे, असे उत्तर मंत्री पंकज भोयर यांनी दिले आहे.