ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – येथे हिंदु महासभेकडून ‘गोडसे ज्ञानशाळा’ प्रारंभ करण्यात आली असून त्याद्वारे पंडित नथुराम गोडसे यांचे विचार युवकांपर्यंत पोचवले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. येथील दौलतगंजमधील हिंदु महासभेच्या कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमाच्या वेळी पं. नथुराम गोडसे यांच्यासह अनेक महापुरुषांची छायाचित्रे ठेवण्यात आली होती. येथेच ही ज्ञानशाळा प्रारंभ करण्यात आली आहे. ‘ही ज्ञानशाळा युवा पिढीला भारताच्या फाळणीच्या पैलूंविषयी आणि विविध राष्ट्रीय नेत्यांविषयीची माहिती देईल’, असे या संघटनेकडून सांगण्यात आले.
हिंदु महासभेचे उपाध्यक्ष जयवीर भाद्वाज यांनी पत्रकारांना सांगितले की, आमच्यासमवेत तरुणांसह अनेक महिलादेखील आहेत. गुरु गोविंद सिंह, डॉ. हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासारख्या महापुरुषांपासून गोडसे यांनी प्रेरणा घेतली होती. आमचे म्हणणे आहे की, या देशाचे कुणीही विभाजन केले, तर हिंदु महासभा त्याला प्रखरपणे उत्तर देईल.