World Meditation Day : ‘२१ डिसेंबर’ ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून साजरा होणार
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘२१ डिसेंबर’ हा ‘जागतिक ध्यान दिवस’ म्हणून घोषित करण्याचा भारताचा प्रस्ताव सर्व देशांनी मान्य केला. भारत, लिक्टेंस्टीन, श्रीलंका, नेपाळ, मेक्सिको आणि अंडोरा या देशांच्या गटाने १९३ सदस्यांसमोर हा प्रस्ताव आणला होता. या देशांनी या प्रस्तावासंबंधीची सर्व माहिती संयुक्त राष्ट्रांच्या देशांसमोर मांडली.