आरोपी तमीमसह अन्य ३ मित्रांवर गुन्हा नोंद

पुणे – माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अभियंता म्हणून नोकरी करणार्या तरुणीला शीतपेयांतून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर ४ जणांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केले. त्याची छायाचित्रे काढून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये आणि तिचा आयफोन घेतला. शेवटी या त्रासाला कंटाळून या प्रकरणी ३३ वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यावरून तमीम हरसल्ला खान याच्यासह अन्य ३ मित्रांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (भारतात शिक्षेची कार्यवाही तात्काळ होत नाही. त्यामुळे धर्मांधांना कायद्याची भीती वाटत नाही. भारतात गुन्हेगारांना शिक्षा जाहीर होणे आणि तिची कार्यवाही होणे या सर्व प्रक्रिया जलदगतीने झाल्यास धर्मांधांवर कायद्याची जरब बसेल ! – संपादक)
तक्रारदार तरुणी मूळची कर्नाटकातील असून ‘फेसबुक’च्या माध्यमांतून वर्ष २०२१ मध्ये आरोपी तमीम याची ओळख झाली होती. तमीम याने स्वत: बांधकाम व्यावसायिक आहे असे सांगून लग्नाच्या आमिषाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केले.