
कोल्हापूर – फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या या काळात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे हिंदु धर्मासाठी दिव्य स्वरूपाचे बलीदान झाले. त्याचे स्मरण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महिनाभर बलीदानमास पाळण्यात येतो. या बलीदानामासाच्या शेवटी मूकपदयात्रा काढण्यात येते. या मूकपदयात्रेसाठी वापरण्यात येणार्या धर्मवीर ज्वालेच्या स्वागतासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २४ मार्चला धर्मवीर ज्वाला स्वागतयात्रा काढण्यात आली. वढू-बुद्रुक येथून आणलेली धर्मवीर ज्वाला घेऊन सायंकाळी ६ वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मारक रुईकर कॉलनी येथे सर्व धारकरी एकत्रित आले. यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून यात्रा काढण्यात आली.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर शहर कार्यवाह आशिष लोखंडे, अनिश यादव, गोवर्धन समगे, नितीन काळे, पवन देसाई, विनायक माने, बबलू ठोंबरे, मनोज सुतार, ओंकार सोनटक्के, आदित्य जासूद, रोहित अतिग्रे यांसह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते. ही यात्रा शिवतीर्थ छत्रपती श्री शिवाजीं महाराज चौक कोल्हापूर येथे समाप्त झाली.