सीरमला लागलेल्या आगीच्या चौकशीनंतरच अपघात कि घातपात हे स्पष्ट होईल ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आगीत महत्त्वाच्या साहित्यांसह १ सहस्र कोटींहून अधिक हानी

पुणे – सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीविषयी चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता कि घातपात हे स्पष्ट होईल. त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य रहाणार नाही, असे नमूद करतांनाच ज्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, त्यांचे पूर्ण दायित्व आस्थापनाने घेतले आहे. त्या व्यतिरिक्त आणखी काही करण्याची आवश्यकता असेल, तर सरकार निश्‍चित करेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी सीरमला भेट दिली. त्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेत सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावालासुद्धा उपस्थित होते. आगीत १ सहस्र कोटींहून अधिक हानी झाल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. तसेच बीसीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून महत्त्वाच्या साहित्याची हानी झाली आहे, असे पुनावाला यांनी सांगितले.