अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले !

अण्णा हजारे

नगर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते; परंतु केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते आणि अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याचे घोषित केले.
यासाठी भाजप नेत्यांकडून आतापर्यंत ७ भेटी घेण्यात आल्या होत्या. या हजारे यांच्या मागण्या मान्य केल्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले. त्यासाठी एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सहा मासात ही समिती हजारे यांच्या मागण्यांच्या संदर्भात निर्णय घेऊन कार्यवाही करील.