पाली सुधागड येथे ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !
‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रविवार २३ मार्च या दिवशी रायगडच्या पाली येथील सुधागड येथे मोहीम पार पडली. यात ३७ जणांनी सहभाग घेतला.