अहिल्यानगर येथे विवाहितेवर अत्याचार; २ धर्मांधांना अटक !

अपकीर्ती करण्याची आणि मुलास जिवे मारण्याची धमकी

अहिल्यानगर – विवाहितेची ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांतून ओळख करून त्यानंतर तुला अपकीर्त करू, तुझ्या मुलास जिवे मारू अशी धमकी दिली. तक्रारदारास धमकावून खासगी वाहनांतून संगमनेर, भंडारदरा येथे नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी तन्वीर शेख आणि सोहेल शेख यांना पुणे येथील चंदननगर परिसरातून अटक केली आहे. पीडित विवाहितेने एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

धर्मांधांवर गुन्हा नोंद होताच ते दोघजण पसार झाले होते. अहिल्यानगर पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी २ पथके स्थापन केली. आरोपींचे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तचर माहितीतून ते गोवा येथे असल्याचे निष्पन्न झाले. गोवा येथे पोलीस पथक गेल्यानंतर ते पुण्यातील चंदननगर परिसरात असल्याचे समजले. चंदननगर येथून आरोपींना अटक करून एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

संपादकीय भूमिका

कायद्याचे भय नसणारे उद्दाम धर्मांध ! अशा धर्मांधांना कठोर शिक्षा लवकरात लवकर होणे आवश्यक !