
मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – बीड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत १७७ योजना राबवल्या जात आहेत. या अंतर्गत गेवराई तालुक्यातील ४५ आणि माजलगाव तालुक्यातील २९ गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निविदा प्रक्रियेनंतर मे. प्रगती कन्स्ट्रक्शन या आस्थापनाला कामे मान्य करण्यात आली आहेत. कामाची प्रगती असमाधानकारक असल्यामुळे या आस्थापनाला काळ्या सूचीत टाकण्यात येईल, असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी २५ मार्च या दिवशी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. याविषयी सदस्य विजयसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.