दीपावलीच्‍या कालावधीत हिंदु धर्म, देवता, राष्‍ट्रपुरुष यांची विटंबना होत असल्‍याचे आढळल्‍यास ‘सनातन प्रभात’ला पाठवा !

‘सनातन प्रभात’मधून दीपावलीसंदर्भात अध्‍यात्‍मशास्‍त्रीय माहिती देण्‍यासह हिंदु धर्म देवता, राष्‍ट्रपुरुष यांचा अनादर रोखण्‍यासाठीही प्रबोधन केले जाते. दीपावलीच्‍या काळात आपल्‍या आजूबाजूला हिंदु धर्म, देवता, राष्‍ट्रपुरुष यांची विटंबना होत असल्‍यास संबंधितांचे प्रबोधन करून त्‍याची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा.

#No Bindi No Business : अनेक दागिने व्यापार्‍यांनी यंदाच्या दिवाळीच्या विज्ञापनांत महिलांना कुंकवासह दाखवले !

मागील वर्षीपर्यंत बहुतांश दागिने व्यापार्‍यांकडून दागिन्यांच्या विज्ञापनांमध्ये महिलांना विनाकुंकू दाखवण्यात येत होते.

‘फोक्सवॅगन’ने प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

वाहन निर्मिती करणारे जर्मनीतील आस्थापन ‘फोक्सवॅगन’ने तिच्या विज्ञापनातून प्रभु श्रीरामाचा अवमान केला होता. याचा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी विरोध केल्यावर हे विज्ञापन हटवण्यात आले आहे.

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकारांचे नृत्य !

प्रबोधनासाठी देवतांचे मानवीकरण करण्यातून देवतांची विटंबना होते, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच लक्षात येत नाही !

हिंदूंच्या विरोधानंतर ‘फिनोलेक्स’ आस्थापनाने भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणारे विज्ञापन हटवले !

हिंदु जनजागृती समितीने ‘एक्स’वरून (पूर्वीच्या ट्विटरवरून) केला होता विरोध !

विनोदी कलाकार तन्मय भट यांचा सहभाग असणारे विज्ञापन ‘कोटक महिंद्रा बँके’ने घेतले मागे !

अशांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात का डांबले जात नाही ?

क्रिकेट खेळाडू ऋषभ पंत यांच्याकडून शास्त्रीय संगीताचा अवमान

भारतीय संगीताचा अवमान करणार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून अन्य कुणीही असा अवमान करण्याचे धाडस करणार नाही !

हिंदुद्वेषी विज्ञापनाच्‍या विरोधात  #AamirKhan_Insults_HinduDharma  हा ट्‍विटरवर ट्रेंड पहिल्‍या क्रमांकावर !

यू-ट्यूबवर प्रसारित झालेल्‍या ‘एयू स्‍मॉल फायनान्‍स बँके’च्‍या विज्ञापनामध्‍ये हिंदु धर्मातील परंपरेचा अवमान करण्‍यात आला आहे. यामध्‍ये विवाहानंतर घरजावई बनवलेला वर (आमीर खान) आणि वधू (कियारा आडवाणी) यांना गृहप्रवेश करतांना दाखवले आहे.

अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्याकडून हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित !

हिंदु धर्म आणि परंपरा यांच्या विरोधात अभिनय करणारे हिंदुद्वेष्टे आमीर खान आणि हिंदु धर्मविरोधी भूमिका घेणार्‍या कियारा अडवाणी यांच्या चित्रपटावर सर्वच हिंदूंनी बहिष्कार घालावा !

प्रभु श्रीरामांचे विडंबन करणार्‍या आस्थापनाच्या विरोधात बांदा येथील रामभक्तांचे ‘त्याग’ आंदोलन वर्षभर चालू

कोणतीही तोडफोड नाही. अपशब्द नाही. ‘बॅनरबाजी’ नाही, तसेच आस्थापनाचे नावही न घेता आंदोलन चालू आहे. या आंदोलनाचा परिणाम म्हणजे ‘ते’ वादग्रस्त विज्ञापन दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवण्याचे प्रमाण उणावले !