छत्तीसगड आणि तेलंगाणा यांच्या सीमेवरून १० नक्षलवाद्यांना अटक

या स्फोटकांचा वापर छत्तीसगड किंवा तेलंगाणा राज्यांत नक्षलवादी आक्रमणासाठी वापर करण्यात येणार होता. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांपैकी ५ जण छत्तीसगडचे, तर उर्वरित ५ जण तेलंगाणामधील रहाणारे आहेत.

टी. राजा सिंह यांचे भाजपमधून झालेले निलंबन रहित होण्याची शक्यता !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ऑगस्ट २०२२ मध्ये टी. राजा सिंह यांना भाजपने ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले होते.

‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्मा यांचा अपघात

माझ्या अपघाताविषयीचे वृत्त सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यामुळे मला असंख्य लोक संपर्क करून माझी विचारपूस करत आहेत. आम्ही सर्व जण सुखरूप आहोत. कोणतीही गंभीर बाब नाही. कुठलीही चिंता नसावी. तुम्ही दाखवलेल्या काळजीसाठी आभार.

आसाममध्ये आम्ही ६०० मदरसे बंद केले, आणखी ३०० मदरसे बंद करणार ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा

सर्वच  भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी असे धोरण अवलंबले पाहिजे !

भाग्यनगरमध्ये पकडलेल्या आतंकवाद्यांना मानवी बाँब बनून माझी हत्या करायची होती ! – आमदार टी. राजासिंह

१०० कोटी हिंदूंच्या देशात हिंदुत्वनिष्ठ नेते असुरक्षित असणे हिंदूंना लज्जास्पद ! अशा धमक्या कधी अन्य पंथीय नेत्यांना मिळत नाहीत, हे लक्षात घ्या !

येत्या १४ मे या दिवशी तेलंगाणामध्ये हिंदु एकता यात्रेचे आयोजन

तेलंगाणाचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी येत्या १४ मे या दिवशी करीमनगर येथे हिंदु एकता यात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगत या वेळी ‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कलाकार आणि निर्मितीतील लोक यांचे स्वागत करण्यास उत्सूक असल्याचे म्हटले आहे.

तेलंगाणा येथे उपाहारगृहाच्या मुसलमान मालकाकडून हिंदु तरुणाला चपलाने मारहाण !

तेलंगाणा येथे हिंदुद्वेषी भारत राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे अशा उद्दाम मुसलमानांवर कारवाई होईल, याची शक्यता अल्प आहे !

भाग्‍यनगर (तेलंगणा) येथे आयोजित भव्‍य ‘सनातन एकता शोभायात्रे’त हिंदुत्‍वनिष्‍ठांचा उत्‍स्‍फूर्त सहभाग

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने येथे भव्‍य ‘सनातन एकता शोभायात्रा’ काढण्‍यात आली. महाराष्‍ट्र मंडळाच्‍या ढोलपथकाच्‍या वाद्यगजरात निघालेल्‍या या शोभायात्रेला धर्मप्रेमींचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला.

भाग्यनगर येथील मशिदीच्या आवारात ‘जय श्रीराम’ची रिंगटोन वाजल्याने ३ जणांना पोलिसांनी घेतले कह्यात !

गेली अनेक दशके संपूर्ण देशात ५ वेळ मशिदीमधून ऐकवली जाणारी अजान हिंदू ऐकत आहेत, तर काही क्षण वाजणारी ‘जय श्रीराम’ची रिंगटोन मुसलमान का ऐकू शकत नाहीत ?

तेलंगाणात भाजपचे सरकार आल्यावर मुसलमानांचे आरक्षण नष्ट करू !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रोखठोक प्रतिपादन !