औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारलेले नाही !

संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांची जाहीर स्वीकृती !

श्रीमंत कोकाटे

पुणे – औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मनुस्मृतीप्रमाणे मारले, याला कोणताही तार्किक किंवा समकालीन आधार नाही. कोणताही ऐतिहासिक आधार नाही. तर्काला व्याप्तीची आवश्यकता असते. आम्ही ज्या काळात संभाजी ब्रिगेडसमवेत तार्किक पद्धतीने काम करत होतो, त्याला व्याप्ती मिळालेली नाही. स्वतः औरंगजेबच क्रूर आणि पाताळयंत्री होता. साकी मुस्तेद खान आणि भीमसेन सक्सेना हे औरंगजेबाच्या पदरी असलेले इतिहासकार आहेत. हे दरबारी इतिहासकार सांगतात, ‘औरंगजेबाने अत्यंत निर्दयपणे आणि क्रूरपणे हाल हाल करून मारले’. माझ्या पुस्तकाचा जो संदर्भ घेतला जातो, त्याला कोणताही मनुस्मृतीचा किंवा ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध नाही, अशी स्वीकृती स्वतः संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात बोलत होते. काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी ‘औरंगजेबाने मनुस्मृतीप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली’, असे वक्तव्य केले आहे.

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे हुसेन दलवाई यांना चपराक ! हुसेन दलवाई यांनी हिंदुद्वेषातून विधान केले होते. त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबण्याची मागणी शिवप्रेमींनी केली पाहिजे, तरच अशी विधाने करणार्‍यांवर वचक बसेल !