Sanatan Prabhat Exclusive : मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची संतांची मागणी सरकारने गांभीर्याने घ्यावी ! – खासदार पू. साक्षी महाराज, भाजप
हिंदूंची मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त व्हावीत, अशी सर्व संतांची मागणी आहे. स्थानिक पातळीपासून संसदेपर्यंत भाजप सत्तेत येण्यामध्ये संतांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्याची संतांची मागणी सरकारने गांभीर्याने घ्यावी, असे मत भाजपचे खासदार पू. साक्षी महाराज यांनी व्यक्त केले.