
मुंबई – एका देशात अनेक कायदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मान्य नव्हते. त्यांनी देशात समान कायद्याची मागणी केली होती. विरोधकांच्या ‘भारत जोडो यात्रे’ने देश एक होत नाही, तर समान नागरी कायद्यामुळे देशात एकात्मता येईल. एका देशात दोन कायदे देशाचे विभाजन करतात. राज्यघटनेविषयी बोलणार्यांचा समान नागरी कायद्याला विरोध का ? असा प्रश्न भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी विधान परिषदेत राज्यघटनेवरील चर्चेवरील भाषणामध्ये केला.
विरोधक जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ३७० कलम लागू करण्याची मागणी करत आहेत; मात्र मोदी सरकारने ३७० कलम हटवल्यावरच जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच भारताची राज्यघटना लागू झाली. मुसलमान महिलांवर अत्याचार असलेला तीन तलाक रहित केल्यावर विरोधकांनी विरोध केला. मुसलमान महिलांचे शोषण करणारे ‘हलाला’ विरोधकांना मान्य आहे का ? शरीयतमध्ये एकापेक्षा अधिक बायका चालतात; म्हणून ४ बायका करणे हा कोणता न्याय ? मुसलमानांच्या मतांसाठी विरोधकांना मुसलमान बहिणींवरील हा अन्याय कसा काय चालतो ?, असे प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केले.