
मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – स्टँडअप कॉमेडियन (एकट्याने विनोद करणारा कलाकार) कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता सादर केली होती. तीच कविता, त्याच चालीत, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटली होती. याचे पडसाद २६ मार्च या दिवशी विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी कामरा आणि अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव प्रविष्ट केला.
आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, हा एक प्रकारे सभागृहाचा किंबहुना सभागृहातील सर्व सदस्यांचा अवमान आहे. त्यांनी एकप्रकारे सभागृहातील सदस्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे. अंधारे यांनी वापरलेली खालच्या पातळीवरील भाषा आणि कुणाल कामरा याने हेतूपूरस्पर उपमुख्यमंत्री यांच्यावर वैयक्तिक आणि उपरोधिक केलेले गाणे यांतील भाषा एकप्रकारे सभागृहाचा अवमान करणारे आहे. सभापती राम शिंदे यांनी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे योग्य त्या कारवाईसाठी पाठवत असल्याचे घोषित केले.
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी