नागपूर येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद

नागपूर – एकीकडे पूजा स्थळ (‘प्लेसेस ऑफ वर्शिप’) कायद्याने हिंदूंचा न्याय मागण्याचा अधिकारच हिरावून घेतला आहे, तर दुसरीकडे ‘वक्फ’ कायद्याने हिंदूंच्या भूमी बळकावण्याचा पाशवी अधिकार अन्य धर्मियांना बहाल केला आहे. वक्फ बोर्डाकडून अवैधरित्या बळकावलेल्या भूमीही हिंदु कायद्याने परत मिळवू शकत नाही किंवा त्याविरुद्ध दादही मागू शकत नाही. हे दोन्ही कायदे रहित करणे, हे हिंदूंचे प्राधान्य असले पाहिजे, असे विधान सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. येथे आयोजित महाराष्ट्र मंदिर – न्यास परिषदेला संबोधित करतांना ते बोलत होते.
"Repeal the Waqf and 'Places of Worship' Acts!" – Advocate Vishnu Shankar Jain (@Vishnu_Jain1), Supreme Court at the Maharashtra Mandir Nyas Parishad in Nagpur@HinduJagrutiOrg @SG_HJS pic.twitter.com/WGnCoiR9Y0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2025
महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, श्री टेकडी गणपति मंदिर, नागपूर, श्री जगदंबा देवस्थान कोराडी, श्री पंचमुखी संकटमोचन हनुमान मंदिर, हिल टॉप दुर्गामाता मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे द्वितीय महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर शहर आणि तालुक्यातील २५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त अधिवेशनाला उपस्थित होते.

अधिवेशनाचा आरंभ मान्यवर वक्ते सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकर, हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. सुरेश कुलकर्णी, ‘गुरुसेवा आश्रम’चे अध्यक्ष पू. भागीरथी महाराज, सर्वोच्च न्यायालायाचे अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन, श्रीमत मुधोजी राजे भोसले, श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, अधिवक्ता पांडुरंग थोरवे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे करण्यात आली. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे पू. अशोक पात्रीकर यांनी केले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
मंदिर महासंघाच्या कार्यात भोसले राजे परिवार साहाय्यास सिद्ध ! – श्रीमंत राजे मुधोजी भोसले, नागपूर
मंदिर महासंघाने चांगले कार्य हाती घेतले आहे. सर्वांनी मिळून शासनावर हिंदुहिताचे कायदे व्हावेत, यासाठी दबाव निर्माण करू शकतो. मंदिर संस्कृती रक्षण आणि संवर्धन या अभियानात भोसले राजपरिवार नेहमी समवेत राहील आणि आपण एकत्रितपणे संघटितपणे हे कार्य पुढे नेऊ !
जेव्हा मंदिर सुरक्षित रहातील, तेव्हाच देव, धर्म आणि देश सुरक्षित राहील ! – पू. भागीरथी महाराज
सरकार मंदिरे वाचवणार नाही. ती वाचवायला आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, लढावे लागेल. मंदिर ही सनातन धर्माची शक्तीकेंद्रे आहेत; म्हणून कोणतीही अप्रिय घटना घडली की, मंदिरांवर प्रथम आक्रमण केले जाते. मंदिरांच्या माध्यमातूनच धर्मनिष्ठ हिंदूंचे विशाल संघटन होणार आहे. यातूनच पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेचा मार्ग प्रशस्त होणार आहे. आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेचे विशाल ध्येय समोर ठेवून मार्गक्रमण करायचे आहे.
धर्मासाठी सर्व हिंदूंनी एकत्रित व्हावे ! – अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी, हिंदु विधीज्ञ परिषद

तुळजापूर देवस्थान घोटाळ्याच्या प्रकरणी दिलेल्या न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून ८.५ कोटी रुपयांहून अधिक देवनिधीचा अपहार रोखण्यात महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांना यश आले. तसेच मोठ्या प्रमाणात देवनिधीचा अपहार करणार्या शासकीय कर्मचारी, अधिकारी, मंदिर विश्वस्त यांना वचक बसला. अशा प्रकारे धर्मासाठी सर्व हिंदूंनी एकत्रित व्हायला हवे.
देशातील मंदिरांची एक इंचही भूमी आम्ही कुणाला घेऊ देणार नाही ! – सुनील घनवट, मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक

भ्रष्टाचाराची शेकडो प्रकरणे असतांना सरकार कुठलेही चर्च, दर्गे अधिग्रहित करत नाही, केवळ मंदिरे अधिग्रहित करतात. जी सरकारे देवाला मानत नाहीत, त्यांना मंदिर अधिग्रहित करण्याचा काहीच अधिकार नाही. देशातील मंदिरांची एक इंचही भूमी आम्ही कुणाला घेऊ देणार नाही. शेकडो वर्षांच्या आक्रमणातही आमची मंदिरे सहस्रो वर्षांपासून अभिमानाने उभी आहेत; कारण आमच्या पूर्वजांनी प्राणपणाने त्यांचे रक्षण केले, आज ते दायित्व आमचे आहे.
श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी मंदिराच्या माध्यमातून केले जाणारे वैद्यकीय व्यवस्थापन याविषयी अनुभवकथन केले.
अधिवेशनात विविध ठराव संमत
अधिवेशनात आयोजित गटचर्चेत २५ ठिकाणी सामूहिक आरती करणे, ४५ मंदिरात वस्त्रसंहिता फलक लावणे, २० मंदिरांत धर्मशिक्षणवर्ग घेणे, तसेच १५ मंदिरांत धर्मशिक्षण फलक लावणे आदी कृती करण्याचे मंदिर विश्वस्तांनी ठरवले. सामूहिक गुढी उभारणी आणि ग्रंथालय चालू करणे या उपक्रमातही अनेक मंदिर विश्वस्त नियमित सहभागी होणार आहेत. अधिवेशनात ११ ठराव संमत एकमताने ‘हर हर महादेव’च्या गजरात संमत करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे हिंदु संघटक श्री. आशिष नागपूरकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. गौरी जोशी आणि सौ. केत