US On Bangladesh Violence Against Minorities : अमेरिकेने बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराचा केला निषेध !

मानवीहक्कांचे पालन करण्याचे निर्देश !

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस

वॉशिंग्टन – अमेरिकेने बांगलादेशाला पुन्हा एकदा तेथील अल्पसंख्यांकांविरुद्ध चालू असलेल्या भेदभावाविषयी कडक चेतावणी दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी म्हटले आहे की, बांगलादेशाने मानवीहक्कांच्या नियमांचे पालन करावे आणि आपल्या नागरिकांशी निष्पक्ष वागावे. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराचा निषेध केल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ही टिपणी केली आहे.

अलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालिका तुलसी गॅबार्ड यांनीही बांगलादेशावर टीका केली होती. याविषयी विचारले असता, टॅमी ब्रूस यांनी  बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या विरोधातील हिंसक घटना थांबवण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. त्या म्हणाल्या, ‘कोणत्याही देशात अल्पसंख्यांकांविरुद्ध हिंसाचार किंवा असहिष्णुतेच्या घटनांचा आम्ही निषेध करतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.’

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील सध्याचा हिंसाचार नुसत्या चेतावणीने थांबणारा नाही, तर बांगलादेशाच्या विरोधात आर्थिक निर्बंधासारखी कठोर पावले उचलणे अमेरिकेकडून अपेक्षित आहे !