रुग्णाईत असतांनाही झोकून देऊन सेवा करणार्‍या फोंडा, गोवा येथील ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. नम्रता शास्त्री (वय ७३ वर्षे) !

‘सौ. नम्रता शास्त्री यांच्याकडे नागपूर येथील अध्यात्मप्रसाराचे दायित्व होते. मागील २ वर्षे त्या फोंडा, गोवा येथे घरी राहून वैद्यकीय उपचार घेत होत्या. तेव्हा त्या रुग्णाईत असूनही नागपूर येथील प्रसाराचे दायित्व सांभाळत होत्या…

साधना आणि धर्मकार्य यांचे महत्त्व सांगून कार्यालयातील धर्मप्रेमी कर्मचार्‍यांना धर्मकार्यात सहभागी करून घेणारे तिरोडा (जिल्हा गोंदिया) येथील श्री. रवींद्र भोंडेकर !

श्री. भोंडेकर यांनी वर्ष २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या एका शिबिराला ४ धर्मप्रेमींना पाठवण्याचे नियोजन केले होते. त्यामुळे ते सर्व धर्मप्रेमी ‘निवेदने देणे, फलकप्रसिद्धी करणे, हस्तपत्रकांचे वितरण करणे, भित्तीपत्रके लावणे’, अशा सेवा आनंदाने करत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले नागपूर येथील श्री. रामनारायण मिश्रा (वय ७२ वर्षे) !

‘नागपूर येथील हिंदुत्वनिष्ठ आणि ‘अखिल भारतीय शरयूपारीण ब्राह्मण संस्थे’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्रा (वय ७२ वर्षे) हे त्यांच्या पत्नीसह मागील २ वर्षांपासून रामनाथी (गोवा) येथे होणार्‍या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाला येतात. ते एका मंदिराचे विश्वस्त आहेत. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. अशोक पात्रीकर यांच्या वाणीतील चैतन्याचा धर्मप्रेमीला झालेला लाभ !

अकोला येथील एक धर्मप्रेमी बर्‍याच वर्षांपासून धर्मकार्यात सहभागी होत आहेत. त्यांच्या पत्नीचा यजमानांच्या साधनेला तीव्र विरोध आहे. सेवेत सहभागी होण्यासाठी कधी पत्नी समवेत वाद झाला, तर ते शांत राहून ‘जय गुरुदेव’ किंवा ‘हरि-विठ्ठल’ असा नामजप करतात.

‘साधकांनो, रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असतांना तेथील ग्रहण केलेले चैतन्य घरी गेल्यावर टिकवून ठेवणे, म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे होय !

साधकांनी आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य ते घरी गेल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांनी आश्रमात ग्रहण केलेले चैतन्य काही काळानंतर अल्प होते आणि साधक पुन्हा मूळ स्थितीत येतो.

गुरुकार्याची तळमळ आणि निरपेक्ष प्रीती यांचा संगम असलेले सनातन संस्थेचे ४२ वे संत पू. अशोक पात्रीकर (वय ७४ वर्षे) !

२७.३.२०२४ या दिवशी सनातन संस्थेचे संत पू. अशोक पात्रीकर यांचा ७४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक ! – विजय शर्मा, उपमुख्यमंत्री, छत्तीसगड

ज्याप्रमाणे जगभरातील ज्यूंनी इस्रायल बनवण्याचा संकल्प केला, त्याचप्रमाणे हिंदूही त्यांचा संकल्प विसरलेले नाहीत. आज श्रीराममंदिर साकार झाले आहे. पुढचा संकल्पही निश्‍चितपणे पूर्ण होईल !

मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अमरावती येथे महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन !

भारत स्वतंत्र झाल्यानंतर देश धर्मनिरपेक्ष झाला. मंदिरांमधून धर्मशिक्षण देणे बंद झाल्याने हिंदूंची बिकट अवस्था झालेली आहे. भाविकांना धर्मशिक्षण दिल्यासच मंदिरे पुन्हा सनातन धर्मप्रसाराची केंद्रे होतील !

प्रार्थना आणि नामजप केल्यावर गुरुकृपेने पुराचे पाणी साधक अन् धर्मप्रेमी यांच्या घरात न येणे

‘२१.७.२०२३ ला रात्रीपासून जोराचा वारा आणि पाऊस चालू होता. दुसर्‍या दिवशीपर्यंत गावातल्या नदीला पूर आला. आमच्या घराच्या पाठीमागे असलेल्या ओढ्याचा प्रवाह ….

अकोला येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या संदर्भात ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्याम राजंदेकर (वय ७७ वर्षे) यांना सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि नामजपादी उपाय करतांना आलेल्या अनुभूती

‘अकोला येथील ‘जुने शहर’ या विभागातील संवेदनशील भागात रहाणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांकडून मागणी आल्यानुसार १२.३.२०२३ या दिवशी एका छोट्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे….