सातारा, २६ मार्च (वार्ता.) – येथील सदरबाझार स्थित नवीन म्हाडा वसाहतीमध्ये भटक्या श्वानांनी २ मुलींवर आक्रमण केले. यामध्ये दोन्ही मुली घायाळ झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची भेट घेऊन भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नागरिकांनी यापूर्वीही अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रार केली होती. त्यावर कोणतीच उपाययोजना काढली गेली नाही. आता उपाययोजना न काढल्यास आंदोलन करण्याची चेतावणी स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकाभटक्या श्वानांचा बंदोबस्त न करणारे असंवेदनशील प्रशासन ! |