गृहराज्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना अन्वेषण करून कार्यवाही करण्याचा आदेश

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारे वादग्रस्त ‘बिग कॅश पोकर’ विज्ञापन अंततः सामाजिक माध्यमांवरून हटवण्यात आले; मात्र दोषींवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे सुराज्य अभियानाच्या वतीने श्री. सतीश सोनार आणि श्री. रवि नलावडे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांची भेट घेऊन हे विज्ञापन म्हणजे पोलीसदलाच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणारा गंभीर प्रकार असल्याचे निदर्शनास आणले.
या भेटीत विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री श्री. योगेश कदम यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना अन्वेषण करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याविषयी ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक श्री. अभिषेक मुरुकटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
या प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की
१. हे विज्ञापन हटवण्यात आले असले, तरी अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश’चे मालक अंकुर सिंह यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
🚨 Action Ordered Against Nawazuddin Siddiqui & Big Cash Online gaming Appl!
📌 Maharashtra’s Minister of State for Home Yogesh Kadam, directs the Mumbai Police Commissioner to investigate & take action!
📃 Government action follows @SurajyaCampaign‘s appeal to Yogesh Kadam… https://t.co/Q7Cf0ZFVgj pic.twitter.com/rO5YOw1uGx
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 25, 2025
२. सुराज्य अभियानाने या प्रकरणात वेळोवेळी फेसबुक, यू ट्यूब आणि ट्विटर (आताचे एक्स) यांच्या तक्रार निवारण अधिकार्यांकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु कोणतीही कारवाई झाली नाही.
३. अखेरीस तक्रार अपील समितीकडे तक्रार केली आणि त्यानंतरच हे विज्ञापन हटवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या अमिता सचदेवा यांच्या कायदेशीर हस्तक्षेपामुळे हे यश मिळाले आहे.
४. जे पोलीस खाते जुगार खेळणार्यांवर गुन्हे नोंद करून त्यांना अटक करते, त्याच पोलिसांच्या वेशात असे विज्ञापन केले जाते, हे पोलीसदलाची प्रतिमा मलीन करणारे आणि व्यावसायिक लाभासाठी समाजाची दिशाभूल करणारे आहे. यात ‘बडे काम का खेल’ असे म्हणून ‘जुगार’ हा गुन्हे उकलण्यासाठी आवश्यक कौशल्य असल्याचे पोलीस वेशातील नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याकडून प्रचारित करण्यात आले होते, तसेच यात भगवद्गीतेचा अवमानही करण्यात आला होता.
५. त्यामुळे सुराज्य अभियानाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ‘बिग कॅश पोकर’ आस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची, तसेच भविष्यात पोलीसदलाच्या प्रतिमेचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर धोरण आखण्याची मागणी सरकारकडे केली आहे.