पीडित तरुणीने स्वत:ला वाचवण्यासाठी रेल्वेतून मारली उडी !
भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणाची राजधानी असलेल्या भाग्यनगरमध्ये धावत्या रेल्वेगाडीत एका तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वतःला वाचवण्यासाठी तरुणीने धावत्या रेल्वेगाडीमधून उडी मारली. त्यानंतर ती घायाळ झाली. (रेल्वे पोलीस आणि प्रशासन यांना हे लज्जास्पद ! – संपादक) पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
१. भाग्यनगरच्या सिकंदराबाद रेल्वेस्थानकावरून मेडचलला जाणार्या ‘एम्.एम्.टी.एस्. ट्रेन’च्या महिला डब्यात ही मुलगी एकटीच प्रवास करत असतांना ही घटना घडली.
२. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले, ‘डब्यात प्रवास करणार्या २ महिला अलवल रेल्वेस्थानकावर उतरल्या. त्यानंतर मी डब्यात एकटीच होती. तेवढ्यात एक तरुण माझ्याकडे आला आणि मला त्रास दिला आणि माझ्यावर बळजोरी करू लागला. तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी मी चालत्या ट्रेनमधून उडी मारली.’
३. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीचे डोके, हनुवटी, उजवा हात आणि कंबर येथे जखमा झाल्या होत्या. रस्त्याने जाणार्या काहींनी तिला घायाळ अवस्थेत पाहिले. त्यांनी तिला सरकारी रुग्णालयात भरती केले.
४. यापूर्वी ६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी अशीच एक घटना तमिळनाडूमध्ये घडली होती. तमिळनाडूच्या वेल्लोर जिल्ह्यातील कटपाडीजवळ धावत्या रेल्वेगाडीत एका ३६ वर्षीय गर्भवती महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाला होता. तिने विरोध केल्यामुळे चालत्या ट्रेनमधून तिला खाली ढकलण्यात आले होते.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसच्या तेलंगाणामध्ये महिला असुरक्षित ! |