संताजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ भाळवणी आणि कारखेव येथे स्मारक उभारणार !
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या काळात संताजी घोरपडे यांनी आपले कौशल्य दाखवत औरंगजेबाच्या विरोधात लढा दिला. त्याच्या साडेतीन लाखांच्या छावणीत ४०० ते ५०० मावळ्यांसह शिरून त्यांनी मुख्य तंबूचा कळस हिसकावून मोगल सैन्याला मराठा सैन्याची शक्ती दाखवून दिली.